दिवा प्रभाग समिती बनली अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांची “हाॅटस्पाॅट”
सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि स्थानिक यांच्या तक्रारी, धरणे आंदोलनांचा पाऊस, मात्र अधिकारी बसले छत्री घेऊन
हुसैन शेख
ठाणे – ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम बिनधास्तपणे बनविण्याचे धक्कादायक प्रकार सुरू झाले आहेत, या विरोधात पत्रकार, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे तक्रार आणि धरणे आंदोलन केली होती, मात्र ठाणे महापालिका आयुक्त आणि स्थानिक प्रभाग समिती अधिकारी आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत, सध्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दोस्तीचा मागे एव्हीके कंपाउंड येथे अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती बांधण्याचे काम बिनधास्तपणे जोमाने सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी मुंब्रा शहराची समाज सेविका नाज गोलंदाज यांनी दिवा प्रभाग समिती समोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते त्या वेळी त्यांना दोस्तीच्या मागे एव्हीके कंपाउंड, एम. ८ कंपाउंड, खान कंपाउंड, शिळफाटा अचार गली आणि शिळ म्हापे रोडवर होत असलेली सर्व अनधिकृत बांधकामे एका आठवड्यात तोडण्याचे आश्वासन देऊन आंदोलन संपुष्टात आणले, मात्र अद्याप ही या सर्व बेकायदेशीर इमारतींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्या नंतर दिवा शहरातील समाज सेविका प्रिया कुलकर्णी यांनी थेट ठाणे महापालिका समोर बेमुदत उपोषण सुरू केले व स्थानिक दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त आणि मुंब्रा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त यांच्यावर आरोप केला पाच दिवस उपोषणाला बसल्या नंतर त्यांना पण सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्याचे फक्त आश्वासन देण्यात आले, मात्र दैनिक पोलीस महानगरचे पत्रकार यांनी दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दोस्तीचा मागे AVK कंपाउंड येथे अनधिकृत बेकायदेशीर इमारती विरोधात तक्रार केली असता स्थानिक दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांतर्फे काही कारवाई करण्यात आली नाही, या तक्रारीचा पतपुरवठा करण्यासाठी दैनिक पोलीस महानगरचे पत्रकार यांनी ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी यांची भेट घेतली व दिवा प्रभाग समिती अंतर्गत होत असलेले अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावे अशी मागणी केली असता त्यांनी आम्ही सर्व कामे बंद करू आता अनधिकृत बेकायदेशीर इमारत बांधण्याचे काम होणार नाही असे उत्तर मिळाले मात्र त्यांनी होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांना तोडण्याची हमी दिली नाही. विशेष म्हणजे या सर्व बांधकामांना बंद करण्याचे आदेश दिले जात आहे पण त्यांना जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जात नाही, ज्याअर्थी पावसाळय़ात जोमाने पाऊस पडतो त्या वेळी आपण छत्रीचा वापर करतो तसाच स्थानिक नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचाद्वारे तक्रारी आणि धरणे आंदोलनांचे पाऊस पडला की ठाणे महापालिका आयुक्त, उपायुक्त, स्थानिक प्रभाग समिती अधिकारी छत्री घेऊन आश्वासन देऊन आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात आणि अनधिकृत बेकायदेशीर इमारत बांधण्याचे काम बिनधास्तपणे जोमाने सुरू राहते.
हरित लवादाकडे तक्रार
शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात थेट हरित लवादाकडे तक्रार करण्याचा निर्णय दैनिक पोलीस महानगरने घेतला आहे अनधिकृत बांधकामामुळे खारफुटीची तोड, खाडीमध्ये भराव, पाणथळ जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे अशी तक्रार महानगरपालिका विरोधात केली जाईल.