विक्रोळी पोलिसांनी आठ तासात केला हत्येचा गुन्हा उघडकीस
विक्रोळी पोलिसांनी आठ तासात केला हत्येचा गुन्हा उघडकीस

मुंबई – विक्रोळी येथील बाबा मटन शॉप जवळ राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेची २१एप्रिल, २०२५ रोजी कोणी अज्ञात इसम खून करुन फरार झाला होता.अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तांत्रिक आणि मानवी यंत्रणाचा उपयोग करुन हनासा सफीक शहा २५ वर्ष नावाच्या युवकाला अटक केली.
विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्जलाल माताफेर ४५ वर्ष यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा क्रमांक १९६/२०२५ कलम १०३(१),३३३ भा.न्या.स.अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर घटना दि. २१ एप्रिल, २०२५ रोजी रात्री घडली या घटनेमध्ये पोलिसांनी तांत्रिक तपास करुन सफर घटना घडल्याच्या ८ तासात एका २५ वर्षीय युवकाला अटक केली. त्याचे नाव हनासा सफीक शहा २५ वर्ष सांगण्यात येत आहे.
परिमंडळ -७ कॅगे पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर यानी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सूर्जलाल माताफेर वय ४५ वर्ष, धंदा एम.एस.सेक्युरिटी वॉचमन, राहणार ठिकाण बाबा मटन शॉप च्या जवळ मच्छी मार्केट विक्रोळी पूर्व, मुळगाव उत्तर प्रदेश मधील असून दि. २१एप्रिल ते दिनांक २२ अप्रैल या दरम्यान कोणीतरी अज्ञात तरुणाने त्याची पत्नी सुनम सुरजलाल वय ३७ वर्षे त्याच्या राहत्या घरामध्ये प्रवेश करून कोणत्या तरी धारदार हत्याराने गळा कापून तिचा खून केला. म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार नोंद केली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर घटनास्थळी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन डॉग स्कॉड फिंगर प्रिंट यांना बोलले.आणि नमूद अपमृत्यूच्या घटनास्थळावर जाऊन घटना स्थळाचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. सदर गुन्ह्यात मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणा वरून या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने सदरचा गुन्हा कबूल असल्याचे मान्य केले आहे. तरीसुद्धा अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी रात्रपाळी पोलीस निरीक्षक कांबळे आणि पोलिस उपनिरिक विठ्ठल गायकवाड आणि त्यांच्या टीमनी केली आहे. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांचे विशेष मार्गदर्शन पोलिसाला लाभले.