Uncategorized
पाणी भरणारी हवी पण…, तरुणानं मेरठ हत्याकांडानंतर बनवला असा व्हिडीओ, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल

पाणी भरणारी हवी पण…, तरुणानं मेरठ हत्याकांडानंतर बनवला असा व्हिडीओ, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल
Pune Viral Video: तरुणाने पुणेरी स्टाईलमध्ये बनवला निळ्या ड्रमवर व्हिडीओ, पाहून नेटकरी झाले नाराज, म्हणताहेत, ही घटना गंमतीनं घ्यायची नाहीये
Authored by अतुल जाधव | police news network. com| Updated: 29 Mar 2025, 12:47 pm
हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

ड्रममध्ये पाणी भरणारी हवी, मला भरणारी नको असा मजकूर या निळ्या ड्रमवर चिकटवून हा तरुण पुण्यातील रस्त्यांवर फिरताना दिसला. अन् त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ गेल्या १५ तासांत २१ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोणी म्हणतेय, पुरुषांमध्ये निळ्या ड्रमबाबत दहशत पसरली आहे. तर कोणी हा चेष्टेचा विषय नाहीये असं म्हणत त्याच्यावर टीका करतेय. काहींनी तर महिलांवर वर्षांनुवर्षे झालेल्या अत्याचाराचे पाढेच वाचले आहेत. तर काहींनी जुने संदर्भ देत प्रेशर कुकर आणि फ्रीजचा विषय पुन्हा चर्चेत आणलाय. हा व्हिडीओ वरकरणी गंमतीशीर वाटतोय पण त्याचा अन्वयार्थ फारच गंभीर आहे.