E-Paper
वांद्रे येथील बँडस्टँडजवळ २०-२५ वयोगटातील एका मुलीचा मृतदेह आढळला.

बांद्रा पोलीस ठाणे हद्दीत बॅन्ड स्टॅण्ड येथे अनोळखी महिला अंदाजे वय २० ते २५ च्या आसपास असून सदर महिला मृत्यू अवस्थेत मिळून आली आहे. सदर महिलेच्या उजव्या हाताच्या मनगटावर ओम व उजव्या हाताच्या अंगठ्याचा वरील बाजूला स्टारचा टॅटूचे चित्र काढले असून तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे तरी सदर महिलेची कोणत्याही पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल असेल तर बांद्रा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक चौधरी /८३८००७२६२९ व पोलीस उपनिरीक्षक. पेडणेकर/९७६९८४०४९० यांच्याशी संपर्क साधावा