Karuna Sharma : करुणा शर्माचा कोर्टात मोठा विजय, धनंजय मुंडेंना झटका, पोटगी देण्याचा आदेश
Karuna Sharma : करुणा शर्माचा कोर्टात मोठा विजय, धनंजय मुंडेंना झटका, पोटगी देण्याचा आदेश

धनंजय मुंडेंना वांद्रे कोर्टाचा दणका, घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी, करुणा शर्मांना लाखोंची पोटगी
#dhananjaymunde #KarunaMunde #karunasharma #BreakingNews #news
आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टात करुण शर्मा यांचा मोठा विजय झाला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज त्यांना यश मिळालं आहे. फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलय.कौटुंबिक पती-पत्नीचा विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याच मान्य केलं. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केला होता. पती-पत्नी वेगळे राहत असतील किंवा घटस्फोट झाल्यास पोटगीची रक्कम द्यावी लागते. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत
आज त्यांचा मोठा विजय झालाय
धनंजय मुंडे यांच्यावरील घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर आता फॅमिली कोर्टा काय निर्णय घेतं, हे पहावा लागेल. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या. त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या. आज त्यांचा मोठा विजय झालाय असं म्हणावं लागेल. कारण कोर्टाने त्यांची बाजू मान्य केली आहे.
1) धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अशत: मान्य.
2) प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करु नये.
3) धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाखाची पोटगी द्यावी.
4) या खटल्याचा 25 हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा.